डॉ. सरोजिनी बाबर
डॉ. सरोजिनी बाबर
मराठी लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा आणि स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या एक संवेदनशील भूमिकन्या व विदुषी
७ जानेवारी १९२०: सातारा जिल्यातल्या वाळवे (वाळवा) तालुक्यातील बागणी या गावी जन्म.
१९४०: शालांत (मॅट्रिक) परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षणासाठी पुण्यात स. प. महाविद्यालयात प्रवेश.
१९४२: महात्मा गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीत सक्रिय सहभाग; आंदोलनादरम्यान येरवडा तुरुंगात अल्पकाळ कारावास.
१९४४: स. प. महाविद्यालयातून बी.ए. पदवी उत्तीर्ण. पुढे एम.ए. व डॉक्टरेट (पी.एच.डी.) पूर्ण केली.
१९४६: त्यांची पहिली कादंबरी ‘कमळाचं जाळं’ प्रकाशित झाली.
२० ऑक्टोबर १९५०: वडील कृष्णराव बाबर यांच्यासोबत ‘समाज शिक्षण माला’ या उपक्रमाची सुरुवात व संपादन कार्याला प्रारंभ.
१९५२ – १९५७: शिराळा-वाळवा मतदारसंघातून पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी होऊन महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या (आमदार) बनल्या.
१९५८: दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील स्त्रीशिक्षण आयोगाच्या सचिव म्हणून कार्य सुरु केले.
१९६१–१९९३: ‘महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती’च्या अध्यक्षा म्हणून सलग ३२ वर्षे प्रदीर्घ काळ लोकसाहित्याचं संकलन व संपादन कार्य केले.
१९६३–१९६६: महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून काम पाहिले.
१९६८–१९७४: भारतीय राज्यसभेच्या सदस्या (खासदार) म्हणून दिल्लीत प्रतिनिधित्व केले.
२६ जानेवारी १९७४: लोकसाहित्यातील मैलाचा दगड ठरलेल्या ‘कुलदैवत’ या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
१९८२: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी तर्फे ‘डी.एस्सी.’ मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
२५ मे १९८४: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची गौरववृत्ती प्रदान.
२३ डिसेंबर १९८४: मुंबई दूरदर्शनवरील प्रसिद्ध ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली.
१ मे १९८५: महाराष्ट्र राज्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘श्रावण भाद्रपद’ हा प्रातिनिधिक ग्रंथ प्रकाशित झाला.
१९९०: दूरदर्शनवर शांताबाई शेळके यांच्यासमवेत १३ भागांची गाजलेली ‘रानजाई’ मालिका प्रसारित झाली.
१९९५–१९९७: गुरुवर्य बाबुराव जगताप पुरस्कार (१९९५), महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार (१९९६) आणि पठ्ठे बापूराव पुरस्कार (१९९७) प्राप्त.
२००८: पुणे विद्यापीठातर्फे ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान.
एप्रिल २००८: वयाच्या ८८ व्या वर्षी पुण्यात कृतार्थ आयुष्याचा निरोप घेतला (शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले).