डॉ. सरोजिनी बाबर
डॉ. सरोजिनी बाबर
मराठी लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा आणि स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या एक संवेदनशील भूमिकन्या व विदुषी
सरोजिनी बाईंनी अनेक लोकगीतं आणि ओव्यांचं संकलन केलं. त्यातल्या काही प्रातिनिधिक ओव्या:
आई-वडिलांवर केलेल्या ओव्या:
बापाजी समोंदर, बया मालन व्हाती गंगा
दोगांच्या सावलीत, कर आंगूळ शिरीरंगा ।।
बापाजी माझा वड, बया मालन वडजाई
दोगांच्या सावलीची, किती सांगू मी बडेजाई ।।
बापाजी माझा वड, बया मालन पिंपरण
दोगांच्या सावलीला, झोप घेते मी संपूर्ण ।।
काशी बनारसी, बनारसीचा डोंगर
मायबाप माजो, सर्व तीर्थांचा आगर ।।
रामचंदर माझा पिता, सीता रानी माझी माता
ववी मी गाते, पित्या माझ्या दौलताला ।।
पिता माझा चंदन, बया माझी गोंदन
हावस माझी हुती, दोन्ही झाडांच्या मधून ।
दारी सोनेरी चाफा, तिथे मखमली रोपा ।
आईची माया मोठी, लेक कन्यादान केली ।
बाबांची माया मोठी, लेक कन्यादान केली ।।
जिवाला माझ्या जड, कसं कळालं जाता जाता
माझ्या त्या बयानं, तांब्या ठेवला तोंड धुता ।।
जिवाला माझ्या जड, कसं कळालं रानामंदी
माझ्या ग पिताजीला, कडू लागलं पानामंदी ।।
सावली शिताळ, हितं उतरीलं वज्जं
मावली माझी बया, इसाऱ्याचं झाड माझं ।।
माय लेकींच बोलनं, जशी दुधाची उकळी
लाडके राजूबाई, माता मनाची मोकळी ।।
बारीक पिठायाची, बाई भाकरी चौघडी
बया माझीच्या जेवनाची, याद हुतीया घडीघडी ।।
सरलं ग दळानू , माजं पायली पायली
विसाव्याची जागा बाई, माझी ती मावली ।।
पित्या माझ्या दौलता, हिच्या कींमत सांग किती
हावस मला मोठी, तांबडं लुगडं काळी चोळी ।।
जातीसाठी माती बाई, खाताना लागं वाळू
पित्या माझ्या दौलता, ढाण्या वागा मी तुजं बाळू ।।
बापाजी समोंदर, बया मालन व्हाती गंगा
दोगांच्या सावलीत, कर आंगूळ शिरीरंगा ।।
बापाजी माझा वड, बया मालन वडजाई
दोगांच्या सावलीची, किती सांगू मी बडेजाई ।।
काशी बनारसी, बनारसीचा डोंगर
मायबाप माजो, सर्व तीर्थांचा आगर ।।
बहीण-भावाचं नातं:
नको धन नको मुद्रा, नको मोत्यांचे हार
देई प्रेमाश्रूंची धार, भाईराया ।
माझ्या ग दारावरनं, शीतळ वारा गेला
सुखी मी आईकिला, भाईराया ।।
गहू हरभऱ्याच्या गाड्या, कशा येशीत थटल्या
सावळ्या बंधुजीनं, दंडभुजांनी रेटील्या ।।
बाजाराच्या वाटं, भाऊ भैनीला भेटला
वळवाचा पाऊस ढग असमानी फुटला ।
भैन भावांडं ग एका, डब्यातील मोती
माय माळीण, भरती गंगेला आली व्हती ।
चवघी आम्ही भैनी, एकच भाऊराया
झाकुनी गेल्या ग, मोगऱ्याखाली जाया ।।
भैन भावांडांची बाई, पोटात त्येंची माया
हिरवं शिताफळ, आत साखरची काया ।
सावळी सुरयीत, माझ्या सपनी साऱ्या रात
ताईता बंदु माझा, हिरा झळकतो काकनात ।।
माहेरची आठवण
माडीवरी ग माडी, चडली सासर मामांजींची
उभी राहून बघते, लंका तिथून माहेराची ।।
सरीलं दळायानू, सूप सारीते पलीकडं
सासरी म्हायेरी, राज मागीते दुहीकडं ।।
अस्सा शेला सुरेख बाई, पालखी ठेवावा
अश्शी पालखी सुरेख बाई, माहेरी धाडावी ।।
अस्सं माहेर सुरेख बाई, खेळाया धाडीतं
अस्सं सासर द्वाड बाई, कोंडूनी मारीतं ।।
झुन झुन पाखरा, जा माझ्या माहेरा ।
बयाला सांग जा, माझ्या या म्हायारीचा ।
तुझ्या या लेकीनं, पुतुळ्या मोडील्या ।।
संसारावर केलेल्या ओव्या:
जिचा भरतार गुनायाचा, तिचा संसार सुखायाचा
शेल्यानं बनातीचा, जुवा बसला दुहीचा ।।
तुमी चांद मी चांदणी, तुमी आगाशी मी गंगनी, बाई ।
समेशी दोघं ।। तुमी हंडा मी परात, तुमी दारात मी घरात, बाई ।
समेशी दोघं ।।
राज भरताराचं, सुखी केलं कसं साधं भोळं ।
रोज जरीचं पातळ, नेसते मी पायघोळ ।।
गोड भरताराचं सुख, राती सांगता अंगणी ।
हासे नाजुक चांदणी, तारा तुटला गगनी ।।
सरीलं दळायानू । सूप सारीते पलीकडं
सासरी म्हायेरी । राज मागीते दुहीकडं ।।
सासर एवढा बस, नका करूसा सासूबाई
दारीच्या चाफ्यापाई, दूर देशाची आली जाई ।।
चवघी आम्ही जावा, पाचवी माझि सासू
नंद कामिनी मदी बसं, माझ्या चुडला सोबा दिसं ।।
ज्याच्या घरी हत्ती घोडे, त्याच्या पडपायी जाऊ नका
लाडक्या सोनुलीला, सासूशिवाय देऊ नका ।।
थोरलं माझं घर, हंड्या गल्लास लोंबत्याती
सासूबाईंचं बाळराज, धनी वाडचाला सोबत्याती ।।
भोंडल्याची गाणी:
ऐलमा पैलमा गणेश देवा । माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा । माझा खेळ मांडिला, वेशीच्या दारी । पारवं घुमतं बुरजावरी
एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबू झेलू
तीन लिंबू झेलू बाई, चार लिंबू झेलू
चार लिंबू झेलू बाई, पाच लिंबू झेलू
पाचा लिंबांचा पानोळा, माळ घाली हनुमंता
अक्कण माती चिकण माती
अश्शी माती सुरेख बाई, ओटा तो मळावा
अस्सा ओटा सुरेख बाई, जातं ते रोवावं
अश्शी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया धाडीतं
अस्सं सासर ड्राड बाई कोंडूनी मारीतं
हरीच्या नैवेद्याला केली, जिलबी बिघडली ।।
त्यातली एवढीशी उरली मळी, त्याची केली बुंदी कळी
तुपात तळली साखरेत घोळली, जिलबी बिघडली ।।
त्यातला एवढासा उरला पाक, त्याचा केला साखरभात
तुपात तळली साखरेत घोळली, जिलबी बिघडली ।।
काळी चंद्रकळा नेसू मी कशी, गळ्यात हार बाई वाकू कशी
पायात पैंजण चालू कशी, बाहिर मामाजी बोलू कशी ।
दमडीचं तेल मी आणू कशी, दमडीचं तेल बाई आणलं
सासूबाईंचं न्हाणं झालं, वन्सबाईंची वेणी झाली ।
मामाजींची दाढी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं
लांडोरीचा पाय लागला, येशीपातूर ओघळ गेला ।
त्यातनं हत्ती वाहून गेला ।।
नणंदा भावजया दोघीजणी । घरात नव्हतं तिसरं कोणी । शिक्यावरचं लोणी खाल्लं कोणी । मी नाही खाल्लं वहिनीनं खाल्लं ।।
आड बाई आडवनी, आडाचं पाणी खारवनी
आडात पडला शिंपला, आमचा भोंडला संपला ।।